Swami Sneh Dining Hall Chinchwad
Specialty:
- Servings done in Silver plates, this dates back to the dining by Peshwas (the royal family in Pune)
- Sitting arrangements are in traditional Indian style, which means you will be sitting on the floor (see photos below)
- Every day in week will have different menu, please look at the menu card given in this post for ready reference
Time
11 AM to 2 PM
7.30 AM to 10 PM
Contact details
9422311106, 9422040251
Address :
Ashirwad Dhiraj Apartment,
Near Moraya Gosavi Temple,
Chinchwad Gaon, Pune 411033
चांदीच्या ताटात पेशवाई थाटात
महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा आवश्य भेट द्या…..
पंडित केटरर्स संचलित
⚜स्वामीस्नेह डायनिंग हॉल⚜ ला . . . .
पिंपरी-चिंचवड, पुणे मध्ये प्रथमच सुरू झाले आहे पेशवाई थाटात चौरंग ताट बैठक जेवण व्यवस्था.
रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पारंपारिक पदार्थांचा समावेश असलेली अनलिमिटेड थाळी
चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराच्या अगदी जवळ, मोरया यात्री निवासाच्या समोर, आशीर्वाद धीरज अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर अगदी घरगुती स्वरूपात महाराष्ट्रीयन थाळी मिळण्याचं एक उत्तम ठिकाणं…अगदी अस्सल साधं सात्विक,चविला स्वादिष्ट आणि केवळ फक्त आपले मराठीच पदार्थ मिळणार हे ठिकाणं आता नावारूपाला येऊ लागलंय…
घरगूती पद्धतीचे उत्कृष्ठ भोजन येथे मिळते आणि तेही अगदी पेशवाई स्टाईलने…खाली जमिनीवर बसून समोर चौरंगावर वाढलेले ताट अशा राजेशाही थाटात पंक्तीत बसून जेवणाचा आनंद खूप भारी वाटतो…
इथला एकूण एक पदार्थ हा अस्सल मराठी, महाराष्ट्रायीन असाचं असतो…परवा आम्ही गेलो तेंव्हा चतुर्थी होती… संपूर्ण स्वयंपाक कांदा-लसूण न वापरता केला गेलेला होता… बिरड्याची उसळ… मटार-बटाटा-फ्लॉवर ईत्यादी घालून केलेली झोळ भाजी… साधी आपल्या घरच्या सारखी गरमागरम पोळी…साधा वरण-भात तूप मीठ लिंबू… तिखट मिठाची पुरी… बुंदीचा रायता, ओल्या नारळाची चटणी…कोथिंबीरवडी…पुलाव…टोमॅटोचा सार…आणि गोड म्हणून गुलाबजाम आणि उकडीचे मोदक… एकदम अगदी आपल्या घरच्या सारखा साधा सात्विक मेनू …विशेष म्हणजे उकडीचे मोदक हे कितीही वेळा घ्या अगदी बिनधास्त…आणि त्यावर तुपाची धार… अहाहा चतुर्थी सोडायला अजून काय हवं?
येथे सातही दिवस दुपारी आणि रात्री वेगवेगळा मेनू असतो… सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशी सगळा मेनू बदलतो… सोमवारचा कुठलाच पदार्थ मंगळवारी नसतो… अगदी गोडात रोज दोन पदार्थ असतात आणि ते ही दररोज बदलतात… ते ही तेथेच बनवले जातात… बाहेरून आणले जात नाहीत… तळण देखील रोजचे वेगवेगळे असते… आज कोथिंबीरवडी तर उद्या भजी तर परवा बटाटेवडे अशी विविधता रोज असते…
चित्रान्न, मुळा चटका, कोबीची पछडी, सुधारस, सांजा पोळी, भरून तोंडली, शेवगा आमटी इत्यादी काही हटके, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तुम्हाला येथेच चाखायला मिळतील.
याठिकाणी जेवणाच्या चवीत अजिबात तडजोड केलेली नाही… वाढणारी माणसं ही अगदी आग्रहाने वाढत असतात… मालक सौ.पंडित या प्रत्यक्षात स्वतः उभ्या राहून प्रत्येकाला काय हवं नको ते बघतं असतात…… सौ पंडित या स्वयंपाकांची कामं घेतात…
मागच्या आठवड्यात येथे कांदे नवमी साजरी केली गेली… त्यावेळी मेनूत कांदे भात, कांदा भजी, मासवडी, कांद्याचे थालपीठ, वांग्याचे भरीत अशा विविध कांद्याच्या पदार्थांचा मेनू होता…पाडवा, दसरा अशा प्रत्येक सणाला इथला मेनू हा खास आणि वेगळा असतो…आता परवाच्या आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांचा वैशिष्ट्यपूर्ण मेनू होता… इतकेच नाही तर समजा तुम्ही ग्रुपने जेवायला जाणार असाल आणि तुम्हाला त्यांच्या मेनूपेक्षा पुरणपोळी सारखं वेगळं असं काही हवं असेल आणि तसं तुम्ही त्यांना आधी सांगितले तर खास तुमच्यासाठी तो स्वतंत्र मेनू तयार करून तुम्हाला वाढला जातो…
एक अस्सल महाराष्ट्रायीन, सात्विक, स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे… एकदा अवश्य भेट द्या…
येथे पार्सलही दिली जातात…
ग्रुप बुकिंग सुरू आहे.
वेळ
दुपारी ११ ते २
संध्याकाळी ७.३० ते १०
पत्ता
स्वामीस्नेह डायनिंग हॉल
१,आशीर्वाद धिरज अपार्टमेंट,
मोरया गोसावी गणपती मंदिरा जवळ,
चिंचवड गाव पुणे ४११०३३
संपर्क
९४२२३१११०६, ९४२२०४०२५१.
या ठिकाणी एक पाटी वाचली…अतिशय आवडली…
कितीही खा, पोटभर खा पण अन्न पानात वाया घालू नका…अन्न वाया घालवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाने पेरलेल्या दाण्यापासून ते अन्न तयार करणाऱ्याच्या मेहनतीपर्यंत सगळ्यांचा तो अवमान असतो…
Leave a Reply