Sri Shankar Maharaj Seva Mandal, Chinchwad has made Eco Friendly Ganesh Idols available this year, surprisingly there is no price to be paid but voluntary donation which is upto you how much to pay. Of-course people like you donate generously knowing the cause behind running this sale by an NGO.
The Ganesh idols are eco friendly, and gets dissolved in the water within an hour. Simply do immersion into a bucket of water and use if for plants in your garden. I fully support this noble cause towards environment as well as social work done by Sri Shankar Maharaj Seva Mandal, Chinchwad
Location for getting Eco Friendly Ganesh Idols :
Shri Morya Prasad Hall,
In front of Morya Gosavi Temple,
Above Patanjali stores,
Chinchwad, Pune 411033
Ganesh Idol display and sell will begin from 15 Oct 2019.
Contact numbers :
9834745538, 9975900943, 9049003081, 9404830160, 9420863920, 9423506522, 9970667210, 9822889338, 9765696622.
Instead of spending money to buy Plaster of paris ganesh POP idols, I suggest to buy an eco friendly Ganesha and donate generously to be part of a cause. Plaster of Paris (PoP) spoil the water bodies with chemicals, so to protect water pollution these idols are made from Shadu soil painted with natural colors.
Dr Avinash Vaidya a city-based pathologist has conceptualized this initiative.
It is in its fifth year now and will see nearly 1500 eco-friendly Ganpati idols on display from 6 Sept 2018 at Morya Prasad Hall, Chinchwad.
The initiative is run by Vaidya under a trust — Sri Shankar Maharaj Seva Mandal, Chinchwad.
Every idol had its price attached, however note that they are not for sale, but if you want an idol, you can take it by donating an amount as per your wish.
You will be given an empty envelope, in which you can put in any amount. And the envelop do not carry any name or identification, so donations are completely anonymous.
The amount collected so far is used for building a home for the elderly
Jijabai Jhende and Pandharinath Jhende Old Age Home at Dehu
This year’s collection is planned to be used for maintenance of the old-age home.
I appeal to people to donate generously for a good cause. Through this initiative, people are not only saving the environment but also helping senior citizens.
….श्री………
देणारे हात, ऐकणारे कान आणि समजून घेणारे हृदय असलेल्या सर्व गणेश भक्तांनो, श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था (बिगर शासकीय) आहे. (रजि. नं. ई 7129/पुणे) या संस्थेमार्फत समाजातील ‘नाही रे’ घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित, उपेक्षित गरजू लोकांसाठी ही संस्था काम करते.
हे एक अध्यात्मप्रेरित सेवा संघटन आहे.
या संस्थेतर्फे रक्तदान शिबिरे , वैद्यकिय चिकित्सा शिबिरे ( कान-नाक-घसा तपासणी,ECG,रक्त तपासणी), पर्यावरण रक्षण व संवर्धन (वृक्षारोपण, प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांची निर्मिती व मोफत वाटप), गोरगरिब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल व जीवघेण्या आजारांशी सामना करित असलेल्या रूग्णांना वैद्यकीय किंवा आर्थिक मदत ही कामे प्रामुख्याने केली जातात.
या संस्थेतर्फे समाजातील निराधार , निरश्रित, वंचित, उपेक्षित, नकोशा, झिडकारलेल्या वयोवृद्ध आई-बाबांचा सांभाळ, प्रतिपाळ करण्यात येतो. या संस्थेतर्फे ‘स्नेहसावली-आपलं घर’ हे देहूगाव (जि. पुणे-महाराष्ट्र राज्य) येथे वृद्धालय चालविण्यात येते. येथे या वृद्धांकडून निवास, भोजन, कपडालत्ता, मनोरंजन व प्रमुख म्हणजे वैद्यकिय सेवेपोटी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. हा वृद्धाश्रम पूर्णतः नि:शूल्क आहे.
या व अश्या सेवा पुरविण्यासाठी संस्थेला निधीची आवश्यकता असते. निधी उभारण्याचा एक अभिनव मार्ग–
‘मूर्ती आमची – किंमत तुमची’
या संस्थेतर्फे शाडूच्या मातीच्या व नैसर्गिक रंगांचाच (हळद- कुंकू-बुक्का- गुलाल) वापर करुन रंगविलेल्या ६० विविध प्रकारच्या चित्ताकर्षक , ६ ईंचांपासून ३० ईंचांपर्यंत उंचीच्या, पाण्यात सहजपणे विरघळणाऱ्या गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात येते.
सुमारे १५०० गणेशमूर्तींचे एक दालन चिंचवडगाव येथे उभारण्यात येते. भाविक गणेशभक्त आवडेल ती गणेशमूर्ती या दालनातून घरी घेऊन जाण्यासाठी निवडू शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मूर्तीला कोणतेही विक्रीमूल्य नसते. भाविकच या मूर्तीचे मूल्य ठरवितो.
आम्ही करीत असलेली सामाजिक कामे लक्षात घेऊन यापर्वणीकाळात तुम्ही आम्हाला भरभरून दान द्यावे ही आमची अपेक्षा. तुम्ही केलेले दान हे संपूर्णपणे गुप्त धनदान असते. ते या सर्वसाक्षी, सर्वव्यापी भगवंताखेरीज कोणालाही समजत नाही. तर अशा या आगळ्या वेगळ्या व्यवहारिक चौकटीत न मावणाऱ्या सामाजिक उपक्रमात भाग घेउन आमच्या ह्या महायज्ञात आपला सहभाग नोंदवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.
निजविले भुक्या पोटी त्याले रात म्हणू नये
केली सोताची भरती त्याले पोट म्हणू नये
आखडले दानासाठी त्याले हात म्हणू नये
धाव ऐकूनी आडलं त्याले पाय म्हणू नये
आपल्या सर्वांना पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!
आपले:
डाॅ. अविनाश शां. वैद्य.9822376704
अध्यक्ष आणि सहकारी
श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड.
स्थळ:
श्री मोरया प्रसाद हाॅल
श्री मोरया गोसावी मंदिरासमोर,
पतंजली स्टोअर्सच्या वरती,
चिंचवडगाव, पुणे ४११ ०३३
गणेश मूर्तींचे दालन 15 Oct पासून सुरू होईल.
संपर्क:-
9834745538, 9975900943, 9049003081, 9404830160, 9420863920, 9423506522, 9970667210, 9822889338, 9765696622.
मी आणि माझे ऐसी आठवण!
विसरले जयाचे अंत:करण
पार्थ तो संन्यासी जाण! निरंतर
……….ज्ञानेश्वरी(५/२०)
Leave a Reply